सातबारा उतारा व जमीन मोजणी. आपल्यापैकी अनेकजण नोकरीधंद्यानिमित्ताने किंवा इतर काही कारणाने आपल्या मूळ गावापासून इतर ठिकाणी म्हणजे शहरात किंवा इतरत्र स्थायिक झालेले दिसतात. बर्याचदा त्या मूळ गावात आपल्या काही वडिलोपार्जित किंवा स्वकष्टार्जित मिळकती तसेच जमिनीदेखील असतात.