True Voter हे निवडणूक प्रक्रियेस समर्पित केलेले आहे. निवडणुका हा लोकशाहीचा पाया असून, भारतीय संविधानाने या निवडणुका निर्भय, मुक्त व पारदर्शक वातावरणात घेण्यास आदेशित केले आहे. हे ॲप मुख्यत: नागरीक, मतदार, निवडणुकीशी संबंधित अधिकारी/कर्मचारी, उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी, राजकीय पक्ष, स्वयंसेवी संस्था, प्रसार माध्यमे व राजकीय विश्लेषक यांना उपयोगी ठरणार आहे.